व्यापारी ,सिंह ,कोल्हा ..... एकदा एक व्यापारी व्यापार करण्यासाठी घरातुन बाहेर पडला. गावोगाव फिरताना तो एका जंगलातून जात होता. जंगलात त्याला एक लुळा पांगळा कोल्हा दिसला. तो व्यवस्थित चालू शकत नव्हता. परंतु तरीही तो कोल्हा तगडा दिसत होता. व्यापारी आश्चर्यचकीत झाला. हा कोल्हा अपंग आहे. याला खायला काय मिळत असेल ? असा विचार तो करत असतानाच जंगलातून एक सिंह येताना दिसला. सिंहांने एक मोठी शिकार केलेली होती. व्यापारी घाबरून झाडा "वर चढला आणि पाहू लागला. सिंह शिकार घेतून कोल्हा जवळ आला. स्वत:चे खाणे झाल्यावर उरलेली शिकार तेथेच टाकून सिंह निघून गेला. त्यानंतर कोल्हाने कसेबसे रखडत ती शिकार गाढली आणि खाने उरकले. • हे सगळे दृश्य पाहुन व्यापाराने विचार केला. अरे या अपंग कोल्हाची सोय देव करतो आहे तर मी तरी कशाला गावोगाव भटकु ? देव मलाही देईल. असा विचार करून तो व्यापारी घरी परतला. आणि देव आपल्याला काय देतो याची वाट पाहू लागला. हळूहळू भुकेने तो व्याकूळ झाला. शेवटी त्याने देवाची प्रार्थना केली आणि विचारले. देवा त्या भुकेलेल्या अपंग कोल्हाला तू खायला दिलेस आणि मला का नाह...